ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान अंतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

         स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स येथे राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (पीएम उषा) अंतर्गत आयोजित “एबीसी – अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट, टूल फॉर वूमन एज्युकेशनल कॅन्टीन्यूटी” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दिनांक ९ मार्च २०२६ रोजी ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. याच विषयावर दोन स्वतंत्र सत्रांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेची सुरुवात माँ सरस्वती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक व उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना डॉ. संजय सिंग यांनी राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान – पीएम उषा अंतर्गत आयोजित या कार्यशाळेची रूपरेषा मांडली. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात एबीसी व अपार आयडीचे महत्त्व लक्षात घेऊन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या सत्रात डॉ. किशोर रेवतकर (विद्या विकास आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, समुद्रपूर) यांनी एबीसी व अपार आयडी म्हणजे काय, त्याचा उद्देश, महत्त्व तसेच रजिस्ट्रेशन प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. वासंती रेवतकर यांनी डिजिलॉकरचा वापर, एबीसी आयडीचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्व याविषयी माहिती देत सर्व विद्यार्थ्यांनी एबीसी आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोहन गिरिया यांनी नवीन शैक्षणिक प्रणालीमध्ये एबीसी आयडीचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यशाळेसाठी राज्यभरातून २०९ जणांनी नोंदणी केली होती. या कार्यशाळेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील पीएम उषा समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे व चिंतामणी कॉलेज गोंडपिंपरीचे आयक्यूएसी व पीएम उषा समन्वयक डॉ. संजय सिंग यांनी केले.

या कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांतील तसेच राज्यातील नांदेड, मुंबई व अमरावती विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. पूनम चंदेल यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये