ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
डॉ. शंकर तलबे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नैसर्गिक मानवाधिकारी सुरक्षा परिषद फोरम या संस्थेमार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊळगाव राजा येथील सुप्रसिद्ध वैद्य तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव डॉ.शंकर प्रभाकर तळबे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण 22 मार्च रोजी सकाळी 10 वाजता धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी कळवले आहे.
डॉ. शंकर तलबे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



