ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षा शांततेत व सुरळीतपणे पार पडली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 15/03/2026 रोजी सकाळी 11:00 वाजता वर्धा जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षा शांततेत व सुरळीतपणे पार पडली. ही परीक्षा दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत असलेले फॅकल्टी ॲाफ इंजिनिअरिंग ॲंड टेक्नॉलॉजी कॉलेज, सावंगी (मेघे), वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती.

सदर परीक्षेसाठी एकूण 1711 उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यामध्ये पुरुष – 1263 व महिला – 448 उमेदवारांचा समावेश होता.

त्यापैकी 1695 उमेदवार परीक्षेस उपस्थित राहिले, तर 16 उमेदवार अनुपस्थित राहिले.

सदर लेखी परीक्षे करिता संपूर्ण उमेदवारांकरिता बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करण्यात आला. लेखी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आजच OMR sheet उत्तरतालीकांची तपासणी (Checking) करून provisional उत्तर तालिका आजच प्रसिद्ध करण्यात आली आहे. संपूर्ण लेखी परीक्षा प्रक्रिया मा. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा तथा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त नेमून संपूर्ण लेखी परीक्षेची प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये