तीन दशकांच्या समर्पित शैक्षणिक सेवेचा गौरव
प्राचार्य दिलीप मॅकलवार यांच्या सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देवाडा खुर्द (ता. पोंभुर्णा) येथील प्राचार्य दिलीप मारोतराव मॅकलवार हे ३१ जुलै २०२६ रोजी प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या तीन दशकांच्या समर्पित, प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज, रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता पोंभुर्णा येथील सुमन मंगल कार्यालयात सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राचार्य मॅकलवार यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांनी प्रेरणादायी कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एस. टिकले, सचिव, राष्ट्रमाता ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, देवाडा खुर्द हे राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक आमदार नागो गाणार, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद नागपूर विभागाचे अध्यक्ष अजय वानखेडे, ग्रामीण मागासवर्गीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कोमलवार, भाजप चंद्रपूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, पोंभुर्णा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, म.रा.शि.प. जिल्हाध्यक्ष विलास खोंड, दै. तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी संजय रामगीरवार, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, गोल्ला-गोलकर यादव समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवार, पतंजली योग समितीचे प्रभारी शरद व्यास, भाजप तालुकाध्यक्ष हरिष ढवस, पोंभुर्णा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पी. एच. गोरंतवार तसेच आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू कुळमेथे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास नागरिकांनी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सुनिता दिलीप मॅकलवार (माजी नगरसेविका), इंजि. गणेश करेवाड, डॉ. कल्याणी करेवाड, आसावरी दिलीप मॅकलवार, कु. गार्गी करेवाड तसेच आप्तेष्ट व मित्रपरिवार यांनी केले आहे.



