ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाबा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

खड्डेमुक्त होणार श्रीसंत कोंडय्या महाराज देवस्थानकडे जाणारा रस्ता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत नागरिकांच्या दळणवळणाचा मार्ग सुकर करण्यासाठी काल (३० ऑक्टोबर) गोंडपिपरी तालुक्यातील मौजा धाबा येथे कोंडय्या महाराज देवस्थान रोडवरील दिपक टेकाम यांच्या घरापासून ते वेडगांवकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

सुसज्ज रस्त्यांवरूनच देशाच्या आणि परिसराच्या विकासाची खरी व्याख्या ठरविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक सोयी-सुविधायुक्त रस्ते उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता असून राजुरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे मत मार्गदर्शनातून आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी श्री संत परमहंस कोंडय्या महाराजांचे पूजा -अर्चना करीत दर्शन घेऊन जनतेच्या सर्वमंगलतेची कामना केली.

यावेळी भाजपाचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, महामंत्री निलेश संगमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती स्वप्नील अनमूलवार, संस्थानचे अध्यक्ष सुहास माडूरवार, सरपंच नंदा घोगरे, उपसरपंच हिरा कंदीकुरवार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय येलमुले, साईनाथ मास्टे, राजेंद्र गोहणे, हरीश घोगरे, अरुण बोरकर, उमाजी झाडे, संतोष मुगलवार, अरुण कोडापे, रोशनी अनमूलवार, कांचन गरपल्लीवार, अर्चना चाफले यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये