ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाने चिंचोली शेतशीवारातुन डिझेल इंजीनच्या चोरी केलेल्या टोळीचा 12 तासाचे आत छडा

आरोपींच्या ताब्यातुन 90 हजाराचा मुद्देमाल केला जप्त.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 31/10/2026 रोजी फिर्यादी नामे हरीनारायण शंकर कामडी रा. सेलू जि. वर्धा यांनी पोलीस स्टेशन सेलू येथे फिर्याद दिली की, त्यांचे चिंचोली शेतशिवारातील शेताचे बाजुला नाल्यावर लावलेले इंदीरा मार्शल कंपणीचे डिझेल इंजीन किमंत 20,000/-रु. चे दिनांक 24/10/2026 ते दिनांक 25/10/2026 रोजी रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने चोरुन नेल्याबाबत पोलीस स्टेशन सेलू येथे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन सेलू येथील डि. बी. पथक पो. हवा. गजानन कमठाने हे करीत असताना गोपनीय माहीती प्राप्त झाली की तिन संशईत इसम मोटार सायकलने डिझेल इंजीन घेवुन सेलू कडे येत आहे. डि. बी. पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) दामोधर अंकुश करनाके वय 22 वर्ष रा. कोलगाव ता. सेलू जि. वर्धा. 2) शिवम घनशाम अवघडे वय 22 वर्ष रा. वडगाव (कला) ता. सेलू जि. वर्धा 3) विवेक विनोद वाढवे वय 20 वर्ष रा. वडगाव (कला) ता.सेलू जि. वर्धा यांना तब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी दिनांक 24/10/2026 ते दिनांक 25/10/2026 रोजी रात्र दरम्यान चिंचोली शेत शिवारातुन शेताचे बाजुच्या नाल्यावर लावलेले डिझेल इंजीन चोरी करुन विकण्या करीता सेलूला घेवुन जात आहे. अशी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेले इंदीरा मार्शल कंपणीचे डिझेल इंजीन किमंत 20,000/-रु. व गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर एम.एच.32 ए.क्यु. 7228 क्रमांकाची मोटार सायकल किंमत 70,000/- असा एकुन 90,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर डि.बी. पथकाने गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना कायदेशीररित्या ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला 100 टक्के मुद्देमाल रिकव्हर करून गुन्हा 12 तासाचे आत उघडकीस आणलेला आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल (IPS) पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सुनील महाडीक उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे ठाणेदार पोलीस स्टेशन सेलू, पोलीस उप निरीक्षक उमेश उगले व डी. बी. पथकातील पोलीस अंमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाने, विनायक गोडे, लोकेश पवनकर यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये