ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार करण देवतळे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळांना डिजिटल शिक्षणाची भेट

जि. प. शाळा डिजिटल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार : आ. करण देवतळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         वरोरा विधानसभा क्षेत्रातील ३५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आमदार मा. करण देवतळे साहेब यांच्या पुढाकारातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीअंतर्गत ८० लाख रुपयाचे ई-लर्निंग संच उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा भद्रावती व वरोरा यांच्या वतीने आमदार करण देवतळे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी आमदार करण देवतळे यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले. डिजिटल शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे विभाग कार्यवाह विलास बोबडे, जिल्हाध्यक्ष अमोल देठे, जिल्हा कार्यवाह विलास खाडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पांडे,सतीश डांगरे जिल्हा प्रतिनिधी,वरोरा तालुकाध्यक्ष संचित जांभुळे, विकास तुरारे, रमेश वाकडे, सचिन जांभुळे, दिगंबर खुळसंगे, रंगनाथ मत्ते, प्रशांत कोल्हे, संदीप गराटे, विकास तुरारे, नितेश भोवरे, विलास मेश्राम, सागर कनोजवार, सदाशिव पाल, मनोज नन्नावरे, नितीन नन्नावरे,बाबाराव वाकडे, संजय बुरुले, अतुल झोटिंग यांच्यासह शिक्षक परिषद पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये