ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गीत गायन स्पर्धेत इंजिनिअर आदेश जोगी प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
रजनीगंधा मुझिक अकॅडमी नागपूर तर्फे सायंटिफिक सभागृह लक्षी नगर नागपूर येथे घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेत इंजिनीअर आदेश शरद जोगी यांना बेस्ट ऑफ किशोर कुमार प्रथम क्रमांक आणि बेस्ट ऑफ महम्मद रफी द्वितीय क्रमांक मिळवला.
या प्रसंगी आदेश जोगी यांना रजनीगंधा मुझीक अकॅडमी तर्फे सन्मान चिन्ह, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
अकॅडमी तर्फे मुख्य संचालिका परिणिता मातूरकर.गिरीश शर्मा,वडील सेवानिवृत्त प्राचार्य शरद जोगी,रेखा जोगी, खुशालराव झाडे,उत्तमराव झाडे,वरुण तांबसकर, धनंजय गोरे आणि आप्तपरिवार, व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.



