ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दत्तसंस्थान देवघाटतर्फे लक्ष्मणराव गमे यांचा सन्मान

गुरुकुंज आश्रम येथे पुण्यतिथी सोहळ्यात गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : श्रीदत्त संस्थान देवघाट, गणेशमोड माथा यांच्या वतीने गुरुकुंज आश्रमचे माजी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

गुरुकुंज आश्रम येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी तथा सर्वसंत स्मृतिदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विचारपीठावर आयोजित कार्यक्रमात संस्थानच्या अध्यक्ष पुष्पाताई बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी संस्थानचे सचिव डॉ. अरुण ठाकरे, सहसचिव दिलीप जेनेकर, कोषाध्यक्ष घनश्याम नांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे, शांताराम देरकर, प्रा. संजयराव ठावरी यांच्या हस्ते लक्ष्मणराव गमे यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामगीताचार्य ॲड. राजेंद्र जेनेकर व प्रचारप्रमुख सुरेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये