ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुमठाणा चौकात दोन अवजड ट्रकची समोरासमोर धडक : भीषण अपघातात एक जखमी

सुदैवाने जीवितहानी टळली : रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघाताचा धोका वाढला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ दीपावलीच्या पूर्वसंध्येला सुमठाणा चौकात दोन अवजड ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन विचित्र अपघात घडला. या भीषण अपघातात एका ट्रकचा वाहक राजू साकेत जखमी झाला असून दुसऱ्या ट्रकचा वाहक सुरक्षित असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, एमएच ३४ बीजी ११७७ क्रमांकाचा डी.एन.आर. अवजड कॅप्सूल ट्रक चंद्रपूरवरून भद्रावतीच्या दिशेने जात होता. दरम्यान, चालकाने वाहन विरुद्ध दिशेने वळविल्याने भद्रावतीकडून चंद्रपूरकडे आपल्या मार्गाने जाणाऱ्या एमएच ३४ एबी ९६४२ क्रमांकाच्या ट्रकला त्याची समोरासमोर जोरदार धडक बसली. या धडकेत एका ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहक राजू साकेत जखमी झाले.

*रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघाताचा धोका!*

या अपघाताच्या निमित्ताने घोट निंबाळा चौक रेल्वे क्रॉसिंगजवळील रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी रस्त्याचे काम दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने वाहनचालकांना एकेरी मार्गाने काही अंतर प्रवास करावा लागत आहे. मात्र, आजपर्यंत संबंधित रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने या मार्गावर अपघाताची शक्यता कायम आहे.

विशेष म्हणजे, संबंधित रस्ते कंपनी आणि ठेकेदाराच्या दिरंगाईमुळेच वाहनचालकांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आजचा अपघात हा संबंधित यंत्रणेसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भद्रावती पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असून, अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळेपर्यंत दोन्ही वाहनचालकांकडून परस्परांविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे समजते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये