हिंगणघाट परिसरात शेतातील कापूस चोरी करणाऱ्या एका मुख्य आरोपीसह तीन विधिसंघर्षित बालके पोलिसांच्या जाळ्यात
स्थानिक गुन्हे शाखा वर्धाची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 30/10/2026 रोजी फिर्यादी नामे प्रवीण माणिकराव शिंदे रा संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिली की दिनांक 29/10/ 2026 ते दिनांक 30 /10 /2026 रोजी दरम्यान फिर्यादी यांचे शेतातील वेचणी केलेला व बंड्यावर ठेवलेला कापूस हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंड्याचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करून नेला अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट अपराध क्रमांक 1712/2026 कलम 303(2) 334(1)बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद असून तपासावर आहे.
स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना आरोपी निष्पन्न करून अथांग कवडुजी कांबळे, वय 19 वर्ष , रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट ता.हिंगणघाट जिल्हा वर्धा व तिन विधी संघर्षित बालक यांचा हिंगणघाट शहरात व आजूबाजूचे परिसरात शोध घेतला असता आरोपी व विधी संघर्षीत बालक हे संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट येथे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता आरोपी व तिन्ही विधि संघर्षित बालक यांनी संगणमत करून मौजा सेलू (मुरपाड) धामणगाव शेत शिवारातून दिनांक 29/10/2026 रोजी बंड्याचे दरवाजाचे कुलूप तोडून बंड्यातील कापुस चोरी केला व चोरी केलेला कापूस हा विधी संघर्षित बालक याचे मामाचे टाटा एस क्रमांक एम एच 46 ए एफ 2164 ने आणल्याची पंचासमक्ष कबुली दिली व चोरी केलेला कापुस हा जे.आर. टेक्सटाइल नांदगाव येथे विकला असल्याचे सांगितल्याने आरोपी व विधी संघर्षित बालक यांनी नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी व विधी संघर्षित पालक यांनी चोरलेला कापूस हा येईल जे. आर. टेक्स्टाईल चे मॅनेजर, आरोपी व विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून पंचासमक्ष 1) 162 किलो कापुस किंमत 14,580/- रुपये, 2) गुन्ह्यात चोरी करण्याकरता वापरलेली एक टाटा कंपनीचा पीकअप क्रमांक MH46AF2146 की. 3,00,000/- रुपये *असा एकूण जु. किं 3,14,580/-रू* चा मुद्देमाल पंचनाम्याप्रमाणे जप्त करून शेतातील कापुस चोरीचा गुन्हा उघडकीस आणून घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल ताब्यात घेऊन तिन्ही विधी संघर्षित बालकासह जप्त मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपास कामी पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोज धात्रक, महादेव सानप, अनुप राऊत, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, आशिष मेश्राम, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, मीना कौरती, सायबर सेल, वर्धा यांनी पार पाडली आहे* .



