ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमआयडीसीकरिता जमीन मोजणीसाठी शेतात पायही ठेवू देणार नाही..!

बोरगावच्या शेतकरी परिषदेत हजारों शेतकऱ्यांचा निर्धार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ प्रस्तावित एमआयडीसीविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र होत असून, शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रात्री ८ वाजता बोरगाव येथे पार पडलेल्या तिसऱ्या शेतकरी परिषदेत हजारो शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली. ‘एकच जिद्द, एमआयडीसी रद्द!’ आणि ‘मोबदला नको, जमीन देणार नाही!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जमीन मोजणीसाठी शेतात प्रवेश करू देणार नसल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

तहसील कार्यालयातील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाळीनंतर मोजणी आणि वैयक्तिक सुनावणीसाठी नोटिसा देण्याबाबत माहिती दिली होती. यावर दीपक चटप यांनी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांनी वैयक्तिक सुनावणीला उपस्थित राहून आपली बाजू ठामपणे मांडावी, असे आवाहन केले. न्यायालयीन लढाईसाठीही शेतकरी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नव्याने प्रसिद्ध झालेल्या विवरणपत्रात भंगाराम तळोधी, भंगारपेठ, चेक विठ्ठलवाडा, नंदवर्धन, तारसा, रारापेठ, सालेजरी यांसह इतर गावांचा समावेश असल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्येही भूसंपादनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. या गावांतील शेतकऱ्यांनीही परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होत आगामी आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केला.

परिषदेला शेतकरी एकता समितीचे अध्यक्ष मारोती भोयर, सचिव माधव लडके, सदस्य राजेश कवठे, कमलेश निमगडे, सचिन फुलझेले, औद्योगिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय वडसकर, उपाध्यक्ष सुरज माडूरवार, विपिन मोरे, तुंडूरवार, तसेच किशोर वडेट्टीवार, शालिक माऊलीकर, रामकृष्ण सांगळे आणि विनोद नागापूरे, बालाजी चणकापूरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला. सुपीक शेतजमीन वाचविण्यासाठी एमआयडीसीविरोधातील लढा अधिक व्यापक करण्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये