ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

विद्यमान मा.श्रीमती डोईफोडे, मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्धा यांनी अप.क्र. ५७१/२० कलम ३७९ भादंवि मधील आरोपी विशाल चंदु कुराडे, वय २५ वर्षे, रा.वडर झोपडप‌ट्टी आर्वी नाका वर्धा यास खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षेच तपशील :-

१. कलम ३७९ भादवि मध्ये आरोपीस १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

घटनेचा थोडक्यात तपशील :- यातील फिर्यादी सदानंद शंकरराव किनगावकर रा. प्रतापनगर वर्धा हे काही कामानिमीत्त मित्राकडे गाडी घेवुन गेले फिर्यादी त्यांचे काम आटोपून घराबाहेर आले असता त्यांची गाडी दिसली नाही फियांदीचे तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे. रामनगर अप.क्र. ५७१/२० कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोहवा आकाश चुंगडे ब.नं. १९५ पो.स्टे. रामनगर यांनी करुन मा.कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. समीर ढुंगे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व पैरवी अंमलदार सफौ संजय चावक व.नं १९९४ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो. स्टे रामनगर ठाणेदार पो.नि. पोणीमा राखुंडे यांनी सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरुध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदर्शन केले. विद्यमान मा.श्रीमती डोईफोडे, मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्धा यांनी गुन्ह्यातील आरोपीस कलम ३७९ भादंवि मध्ये आरोपीस १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये