ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भोयेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील भोयगाव येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, युवक-युवती व समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कुलभूषण हरिभाऊ मोरे (राज्य समन्वयक, ABS क्रांती सेना, महाराष्ट्र राज्य तथा संचालक, अर्थ फाउंडेशन, गडचांदूर) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला शंकर पेगडपल्लीवार (विदर्भ अध्यक्ष, अभामा संघटना), डी. के. सर, संजय पोटे (ग्राम सदस्य, भोयगाव), गोरकुंटवार यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी डॉ. कुलभूषण मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य आणि सामाजिक योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले. आजच्या युवकांनी अण्णाभाऊंच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, सामाजिक बांधिलकी, संविधानिक मूल्ये आणि समाजसेवेची वाट स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

याचबरोबर अनुसूचित जाती (SC) आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर त्यांनी उपस्थितांमध्ये जनजागृती केली. या विषयाकडे संविधानिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित करत सामाजिक ऐक्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश दिला. युवकांनी आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवून शिक्षण, संघटन आणि समाजप्रबोधनासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. शेवटी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मादिगा समाज संघटना कोरपना यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये