पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे प्रजासत्ताक दिन साजरा
प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या हस्ते केले झेंडावंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
संतोष ताले पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी दिली सलामी
वर्धा : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी वर्धा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या हस्ते पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे झेंडावंदन करण्यात आले आणि यानंतर राष्ट्रगीत पासून सुरुवात करण्यात आली.
यावेळी पोलिस स्टेशन वर्धा शहरचे पोलिस निरीक्षक संतोष ताले व पोलिस उपनिरीक्षक परवेझ खान सहाय्यक पोलीस निरीक्षक ढगे पोलिस उपनिरीक्षक बानोत पोलिस उपनिरीक्षक जगताप पोलिस उपनिरीक्षक गायकवाड पोलिस उपनिरीक्षक उगले पोलिस हवालदार गजानन लामसे संजय बोगा पवन निलेकर प्रमोद वाघमारे समीर शेख राणी गोटे पोलिस हवालदार नांदेडकर खासबागे पंकज भरणे लोभेष गाढवे इंगोले राजेश हाडके सुहास चाफले बमनोटे कमलेश बडे प्रशांत वंजारी राजेश राठोड, विवेक बनसोड, सुहास चांदोरे शैलेश भालशंकर, गायकवाड, पाटील, ढोबळे, धर्मे यांनी राष्ट्रगीत झाल्यावर राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन सलामी देण्यात आली व कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना व पोलिस कर्मचाऱ्यांना प्रमोद मकेश्वर उपविभागीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले आणि यानंतर कर्मचाऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला आणि संतोष ताले पोलिस निरीक्षक कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.



