ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर पंचायत पोंभुर्णा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व सत्कार सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : नगर पंचायत पोंभुर्णा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दि. ११ मार्च २०२६ रोजी पोंभुर्णा येथील खुल्या नाट्यगृहात रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सुलभा गुरुदास पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. नंदाताई ऋषीजी कोटरंगे होत्या. मार्गदर्शक म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती कु. अल्काताई आत्राम व डॉ. सौ. वंदना अमोल बावणे उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर पंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल लांडगे, उपाध्यक्ष अजित मंगळ गिरीवार, आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती दर्शन गोरंटीवार, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापती लक्ष्मण कोडापे तसेच नगरसेविका श्वेताताई वनकर, आकाशिताई गेडाम, रिनाताई उराडे, शारदाताई गुरुणुले उपस्थित होत्या.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर, विद्यमान नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्षा, उपाध्यक्षा तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

उद्घाटक नगराध्यक्षा सौ. सुलभा गुरुदास पिपरे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे सांगितले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगर पंचायत पोंभुर्णा नेहमीच प्रयत्नशील राहील, असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानी असलेल्या सौ. नंदाताई ऋषीजी कोटरंगे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे सांगत महिलांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

मार्गदर्शक कु. अल्काताई आत्राम यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे सांगितले. तर डॉ. सौ. वंदना अमोल बावणे यांनी महिलांच्या आरोग्य, शिक्षण व स्वावलंबनाच्या दृष्टीने जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

यानंतर रांगोळी, संगीत खुर्ची तसेच नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कला व कौशल्य सादर केले.

रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मनीषा गुरुणुले, द्वितीय मेघा कस्तुरे व तृतीय दीक्षा उराडे यांनी पटकाविला. संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्चना मुलकलवार तर द्वितीय जिज्ञासा पेंदोर यांनी मिळविला. एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक अश्विनी मेश्राम, द्वितीय दिव्या घडसे व तृतीय प्रबोधिनी मानकर यांनी पटकाविला.

समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रबोधिनी मानकर ग्रुप, द्वितीय भीम कन्या ग्रुप तर तृतीय शीतल गुरुणुले ग्रुप यांनी मिळविले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका श्वेताताई वनकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. रोशन येमूलवार यांनी तर आभार प्रदर्शन महेश्वरी पिंपळशेंडे यांनी केले. यावेळी शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर पंचायत पोंभुर्णा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये