ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागलीला गेलेल्या शेतकऱ्यावर डुकराचा हल्ला ; शेतकरी गंभीर जखमी

चेक कोसंबी नं.१ येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा तालुक्यातील चेक कोसंबी नं.१ येथील एक शेतकरी शेतातील चुरून ठेवलेल्या धानाची राखण करण्यासाठी जागली म्हणून शेतात गेले असता शेतात असलेल्या डुकरांने हल्ला चढवून गंभीर जखमी केले असल्याची घटना दि.१२ डिसेंबरला रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.सागर तावाडे (४६) रा.चेक कोसंबी नं.१ असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील चेक कोसंबी नं.१ येथील शेतकरी सागर तावाडे यांच्या शेतातील धान चुरून ठेवले होते.शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तावाडे धान राखणीसाठी जागली म्हणून गेले होता.

शेताजवळ जाताच शेतात असलेल्या डुकराने त्याचेवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.यात त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला तर पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या.त्यांना तात्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूरला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये