खा. धानोरकर यांच्या पाठपुराव्यामुळे नगर परिषद/पंचायत उमेदवारांना दिलासा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली निवडणूक खर्चाबाबतची महत्त्वपूर्ण मागणी पूर्ण झाली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी नवीन वेळापत्रकानुसार निवडणूक चिन्हे वाटप झाल्यानंतरच (दिनांक ११ डिसेंबर रोजी) केलेला खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. यापूर्वी केलेला सर्व खर्च ग्राह्य धरू नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे उमेदवारांवरील अतिरिक्त खर्चाचा ताण कमी झाला असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या मागणीनुसार निवडणूक आयोगाने सकारात्मक कार्यवाही केली असून, उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे आणि आयोगाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने उमेदवारांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडू नये, या उद्देशाने ही मागणी केली होती. मा. उच्च न्यायालयाने देखील निवडणुकीच्या विलंबामुळे उमेदवारांच्या खर्चात झालेली वाढ मान्य करून, खर्चाची मर्यादा वाढवण्यासाठी मागणी केली होती, ज्यामुळे उमेदवारांच्या खर्चीक वाढीव मागणीला बळ मिळाले होते. या परिस्थितीत, चिन्हे वाटप झाल्यानंतरच झालेला खर्च ग्राह्य धरण्याचा निर्णय झाल्यामुळे, उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे अनेक नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती की, या महत्त्वाच्या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, संबंधित जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांना या संदर्भात स्पष्ट आणि त्वरित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात. त्यांच्या या सकारात्मक पाठपुराव्यामुळे, निवडणुकीतील खर्चाबाबत उमेदवारांमध्ये असलेल्या अनिश्चिततेवर पडदा पडला आहे, आणि केवळ चिन्हे वाटप झाल्यानंतरचा खर्च ग्राह्य धरला जाणार असल्यामुळे, त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे.



