जिवती येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११३ वी जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, बौद्धाचार्य पदाचे जनक तसेच चैत्यभूमीचे संस्थापक सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११३ वी जयंती भारतीय बौद्ध महासभा जिवतीच्या वतीने पंचशील बुद्ध विहार येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष व्यंकटी कांबळे होते. प्रारंभी महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या सामाजिक, धार्मिक व बौद्ध चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमास वैशाली वाटोर, जयमाला कांबळे, गिरीजा दुर्योधन, अश्विनी रोकडे, शीतल राऊत, माधुरी नंदेश्वर, श्रुती वाटोरे, नंदा पाटील, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे (प्रचार-पर्यटन) शहर उपाध्यक्ष नभिलास भगत, शहर सरचिटणीस शरद वाटोरे, तालुकाध्यक्ष दिपक साबने, तालुका सरचिटणीस प्रा. चंदू रोकडे, कोषाध्यक्ष बळीराम काळे यांच्यासह अनेक उपासक, उपासिकांची उपस्थिती होती. संस्थेच्या परंपरेनुसार कार्यक्रमाचा समारोप सामूहिक सरणत्य (प्रार्थना) घेऊन करण्यात आला.



