ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ‘अविष्कार २०२५’ मध्ये उल्लेखनीय सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने आंतर-महाविद्यालयीन अविष्कार २०२५ संशोधन स्पर्धेचे आयोजन पदव्युत्तर शिक्षण संस्था, अकोला येथे दि. ११ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या समितीगृहात करण्यात आले.

या स्पर्धेत समर्थ कृषी महाविद्यालयातील एकूण २२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध कॅटेगिरीत पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल प्रेझेंटेशन तसेच नवीन संशोधन कल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित भित्तीपत्रके, सचित्र मॉडेल्स, फोटो प्रदर्शन व पीपीटीच्या माध्यमातून आपले संशोधन उत्कृष्टरीत्या मांडले.

अविष्कार २०२५ साठी टीम मॅनेजर म्हणून प्रा. अश्विनी जाधव व प्रा. योगेश चगदाळे यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी प्रा. अरुण शेळके, डॉ. दिनेश पाटील, प्राचार्य डॉ. नितीन मेहत्रे, वरिष्ठ लिपिक गजानन देवमाने तसेच बद्रिनारायण काळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे संचालक तथा अधिष्ठाता कृषी डॉ. डी. एम. पंचभाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत, भविष्यात विद्यापीठातून नक्कीच नाविन्यपूर्ण संशोधन व अभिनव अविष्कार संकल्पना पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.

या स्पर्धेत विद्यापीठातील एकूण १६ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमास डॉ. ययाती तायडे (सहयोगी अधिष्ठाता, पदव्युत्तर शिक्षण संस्था, अकोला), विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, डॉ. नितीन कोंडे व डॉ. दारासिंग राठोड उपस्थित होते.

सदर उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे व सचिव सतीश कायंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधनाच्या क्षेत्रात अधिक व्यापक संधी उपलब्ध होतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये