ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुचिता एकनाथ शेंन्डे महिलेचा मनाचा मोठेपणा व प्रामाणिता मानुसकिचा ओलावा

रस्त्यात पडलेला मोबाईल व पाचशे रुपये केले परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          दिनांक ६ मे ला दुपारी कोकेवाडा (मा) येथील पंकज गणपत मानकर यांचा मोबाईल गावावरुन चंदनखेडा येथील आशिष इलेक्ट्रिकल्स येथे कामानिमित्त गेला असतांनी नकळत खिसातुन मोबाईल व ५०० रुपये रस्तावर पडले. पंकज जेव्हा पेट्रोल भरण्याकरिता पेट्रोल पंपवर पोहचला तेव्हा लक्षात आलं की मोबाईल घरी विसरलो की कुठे पडला या आशयाने तो लगेच गावाकडे फिरला. मात्र घरी सुद्धा मोबाईल मिळाला नसल्याने त्याच्या लक्षात आले की माझा मोबाईल व मोबाईल सोबत असलेल ५०० रुपये रस्त्यानी जाताना कुठं तरी पडले असावे त्याकरिता तो रस्त्याने दोन – तिनं वेळा बघुन सुद्धा मोबाईल व पाचशे रुपये मिळाले नाही. तसेच तो लगबगिनी आशिष इलेक्ट्रिकल्स या दुकानात पोहोचला. व आशिष इलेक्ट्रॉनिक चे संचालक आशिष हनवते यांना संपुर्ण हकीकत सांगितली असता आशिष हनवते चंदनखेडा यांनी लगेच मोबाईल संपर्क साधला असता वायगाव ( तु ) येथील रहिवासी सुचिता एकनाथ शेंन्डे या महिलेने फोन वर प्रामाणिक पणे सांगितले की तुमचा मोबाईल फोन आम्हाला रस्त्याने येत असतांना रस्त्यावर पडलेला दिसला तो फोन आम्हाच्या कडे असुन आम्ही आता चंद्रपूर ला लग्न समारंभाच्या कार्यक्रमास जात आहो असे सांगितले. व स्वतःचे नाव व पत्ता सांगितला. त्या गावाला आल्यानंतर मी तुम्हाला संपर्क करतो तुम्ही येवून घेऊन जा असं सांगुन मनाचा मोठेपणा दाखविला. त्यांच्या बोलण्यानुसार त्या गावाला आल्यानंतर स्वतः संपर्क करुन मोबाईल साठी बोलावलं व मोबाईल फोन व कवर मधी असलेले ५०० रु सुद्धा परत केले. यावेळी पंकज मानकर कोकेवाडा (मा) , सुचिता एकनाथ शेंन्डे, गणेश नन्नावरे वायगाव (तु) व चंदनखेडा चे सामाजिक कार्यकर्ते शंकर दडमल, आशिष हनवते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये