ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहर पोलीसांची धडाकेबाज कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहरात मॉडिफाईड सायलेंसर लावुन कर्णकर्कश आवाज करणा-या मोटार सायकल चालकांविरुध्द वर्धा शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. दिनांक 20/11/2026 रोजी रात्री शिवाजी चौक परिसरात पेट्रोलिंग दरम्यान एक ईसम नामे साहिल वाघ्या सातपुते वय 23 वर्ष रा आर्वी नाका, झोपडपट्टी वर्धा हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने बाईक चालवित असताना त्यास थांबवुन बाईकचा कर्णकर्कश आवाज येत असल्याने सायलेंसरची पाहणी केली असता त्यात बदल केल्याचे दिसुन आले त्यावरुन त्यास मोटार सायकल चे सायलेंसर मध्ये कोणी बदल करुन दिला असे विचारले असता त्याने क्षितीज तळवेकर रा आलोडी यांचे नाव सांगितल्याने यांचे गॅरेज वर जावुन पाहणी केली त्या ठिकाणी अशाप्रकारच्या स्पोर्ट बाईक सायलेंसर बदल केलेल्या दिसुन आल्याने बाईक पोस्टे वर्धा शहर येथे डिटेन करुन संबंधिताविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

डिटेन

बाईक (1) यामा कंपनीची आर 15 बाईक क एम एच 29 बीटी 8034

2) केटीएम व्हाईट बाईक क एमएच 30 बीए 4456

3) केटीएम 200 डयुक बाईक क एमएच 32 एएल 1615

4) मॉडीफाईड बजाज पल्सर एनएस400झेड क एमएच 32 बीसी 8160

नागरीकांना आवाहन: वर्धा शहर पोलीसांकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येते की, वाहनामध्ये अनधिकृत बदल करुन कर्णकर्कश आवाज निर्माण करणारे सायलेंसर वापरु नयेत. अशा प्रकारामुळे नागरीकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरीक, लहान मुले व रुग्णांना त्रास होतो. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदरची कारवाई मा पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे सा., मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडिक सा. यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री पोनी नागेशकुमार चतरकर सा वर्धा शहर यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि शरद गायकवाड सोबत पो.स्टॉफ पो.हवा. / 1378 प्रशांत वंजारी, पो.हवा/523 महेंद्र पाटील, पोहवा / 1444 नरेद्र कांबळे, पोशी/1599 वैभव जाधव, पोशी / रंजित भुरसे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये