पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील दारुविक्रेत्या महीलेची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतीत दारुविक्रेती महीला नामे नरगिस परविन शेख युसुफ शेख वय २६ वर्षे रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा हिचेविरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाटचे अभिलेखावर सन-२०२३ पासुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण १० गुन्हे नोंद आहे. सन २०२३ पासुन स्थानबध्द महीला नरगिस परविन शेख युसुफ शेख हिने पोलीस स्टेशन, हिंगणघाट परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. तिच्या दहशतीमुळे अनेक पिडीत तिचेविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. नरगिस परविन शेख युसुफ शेख हिच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने व तिची गुन्हेगारी गतिवीधी थांबत नसल्याने तिचेविरुध्द कलम ९३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९, व कलम १२९ भा. ना. सु. सं. २०२३ अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या होत्या. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सुध्दा ती जुमानत नसुन त्यानंतरही सतत गुन्हे करीत होती.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. अनिल राऊत, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, मा. श्रीमती वान्मथी सी. यांचेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन नरगिस परविन शेख युसुफ शेख हिला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये तिला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
वर्धा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, या उद्देशाने अशाच प्रकारे अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहे.
सन – २०२५ मध्ये एकुण १८ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले होते. तसेच सन २०२६ मध्ये अद्याप पावेतो १४ गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना तसेच अवैध दारुविक्रेते यांना विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.



