सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने संत नामदेव महाराज यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय, जेष्ठ नागरिक संघटना, जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने वतीने संत नामदेव महाराज यांची जयंती आज विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड होते, सर्वप्रथमसंत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी श्री.शांतिलाल निरफळे व प्रकाश खांडेभराड यांनी संत नामदेव महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष श्री अरुण सपाटे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.



