पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील 40 गुन्हातील विदेशी व देशी दारुचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांनी केला नष्ट
राजेश काष्टे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा दिनांक 20 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील 40 गुन्हातील विदेशी दारू व बियर आणि देशी दारू माननीय विद्यमान कोर्ट वर्धा यांच्या आदेशान्वये दारू नष्ट करण्यासाठी आदेश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार हि माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांचे अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा चे निरीक्षक एम. ऐ. शेख यांच्या नेतृत्वाखाली राजेश काष्टे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा दुय्यम निरीक्षक राऊत राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा जवान अमित नागमोते जवान कुमारी सुजाता भारस्करे जवान गिरीश बावणे वाहन चालक योगेश गांवडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक, उपविभागीय कार्यालय वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील ठाणेदार देवेंद्र ठाकूर व सहाय्यक फौजदार अखिलेश यशपाल मोहरर पोलीस स्टेशन सेवाग्राम आणि पंच गणेश हिवरे राहणार पवनार मेहमुदिन वाहबुदिन काजी राहणार पवनार अजय धोंगडे अरविंद लाडे अक्षय कडू यांच्या उपस्थितीत देशी दारूच्या 90 एम एल च्या 754 शिश्या विदेशी दारू च्या 180 एम एल च्या 537 शिश्या विदेशी दारू च्या 350 एम एल च्या 18 शिश्या विदेशी दारू च्या 750 एम एल च्या 09 शिश्या आणि बियर 500 एम एल च्या 58 कॅन एकुण किमंत 3,14,300/-रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला सदर ही कारवाई दुय्यम निरीक्षक राजेश काष्टे राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा जवान अमित नागमोते यांनी प्रत्यक्ष हजर राहून केली.



