ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाणीटंचाईवर भद्रावतीत उपाययोजनांचा अभाव : वरोरा नगरपरिषदेचा आदर्श घ्या!

माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची मागणी : अन्यथा आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ जागतिक तापमानवाढ आणि अनियमित पावसामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता असताना भद्रावती नगरपरिषदेकडून पाणीटंचाई निवारणासाठी कोणतेही ठोस नियोजन करण्यात आलेले नाही. याउलट वरोरा नगरपरिषदेने संपूर्ण शहरात जवळपास २४ ट्यूबवेल उपाययोजनांची पर्यायी व्यवस्था करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भद्रावती नगरप्रशासनानेही वरोरा नगरपरिषदेचा आदर्श घ्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

भद्रावती नगरपरिषदेत ऑक्टोबर २०२६ मध्ये झालेल्या आढावा बैठकीत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, नागरिकांना केवळ एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सांगण्यात आले. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी नागरिकांना पाण्याचे बिल पूर्ण भरल्यानंतरही अर्ध्या रकमेचे बिल भरण्याची सवलत देण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे वरोरा नगरपरिषदेने फेब्रुवारी २०२६ पासूनच ट्युबवेल, पाणी साठवणूक, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, नाल्यांची स्वच्छता तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीजवळ २४ ट्यूबवेल तयार करून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केली आहे. पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

भद्रावती शहरात सध्या पाणीपुरवठ्याची दुष्काळसदृश परिस्थिती नसताना नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करणे शक्य आहे. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अन्यथा एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,माजी नगरसेवक प्रशांत डाखरे व प्रशांत झाडे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये