ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथील प्रभाग क्र. १ मध्ये RO वॉटर एटीएमचे उद्घाटन

नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रुरल डेव्हलपमेंट यांच्या CSR च्या सहकार्याने मेश्राम लेआऊट, प्रभाग क्र. १, गडचांदूर येथे नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आज या RO वॉटर एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.

या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण लोकहितकारी उपक्रम ठरणार आहे.

यावेळी नगर परिषद चे अध्यक्ष निलेश ताजने,उपनगराध्यक्ष श्री. संजय मेंढी, पाणीपुरवठा सभापती श्री. सरवरभाई बांधकाम सभापती श्री. रामसेवक मोरे, श्री. ख्वाजाभाई ,सौ. मनिषाताई परचाके, सौ. अश्विनीताई कांबळे, सौ. प्रणिताताई उपाध्ये, ॲडमिन हेड श्री. मानसजी बेहरा, श्री. चरणदास मेश्राम, श्री. महादेव जैस्वाल, श्री. चेतन शेंडे, CSR हेड श्री. गोवारदीपे सर, श्री. संदीप शेरकी, श्री. संतोष पटकोटवार व श्री. महादेव एकरे यांच्यासह सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या आदित्य बिर्ला समूहाचे व सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये