ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डेप्को कंपनीसमोर भरधाव चारचाकीची धडक ; दुचाकीजवळ थांबलेला तरुण जखमी!

देऊळगाव राजात बेदरकार वाहनचालकाचा धुमाकूळ ; जालना येथील कारचालकावर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : शहरातील डेप्को कंपनीसमोर भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या चारचाकी चालकाने दुचाकीजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात राजेश किसन नागरे (रा. जवळखेड, ता. देऊळगाव राजा) हे जखमी झाले. ही घटना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १ वाजेदरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश निवृत्ती कायंदे (वय ५०, रा. उंबरखेड, ता. देऊळगाव राजा) यांचे जावई राजेश किसन नागरे हे घटनेच्या दिवशी देऊळगाव राजा शहरातील डेप्को कंपनीसमोर आपल्या दुचाकीजवळ थांबले होते. त्याचवेळी पांढऱ्या रंगाची चारचाकी कार (क्रमांक MH 21 CA 5779) तेथून जात होती.

या वाहनाचा चालक परमेश्वर बापुराव कदम (रा. रेवगाव, ता. जि. जालना) याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून राजेश नागरे यांना धडक दिली. या धडकेत नागरे जखमी झाले. या घटनेनंतर फिर्यादी गणेश कायंदे यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात वाहनचालक परमेश्वर बापुराव कदम याच्याविरुद्ध कायम गुन्हा क्रमांक ५२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१ आणि १२५ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बद्रीनाथ डिघोळे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण गिते करीत आहेत..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये