ताज्या घडामोडी

जिवतीत बोगस डॉक्टरकडून ‘हाय पेनकिलर’चा उपचार

तालुक्यातील रुग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हाती _ आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाईची तयारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- वैद्यकीय पदवी किंवा नोंदणी नसताना केवळ ‘अनुभव’ आणि वैद्यकीय प्रतिनिधींकडून मिळालेल्या सॅम्पलच्या जोरावर झटपट उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या गैरप्रकारांमुळे जिवती तालुक्यात किडनी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वारंवार दिल्या जाणाऱ्या पेनकिलर गोळ्यांमुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या किडन्या निकामी होत असल्याच्या तक्रारी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

चांदा ब्लास्टला प्रकाशित करताच या प्रकरणाला वेग आला आहे. आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, जिवती तालुक्यातील बोगस डॉक्टरांची माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच या ठिकाणी झडती घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

तालुक्यात बोगस डॉक्टरांची वाढती संख्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे काही गावांमध्ये लहान क्लिनिक उभारून बोगस डॉक्टर कोणतेही रजिस्ट्रेशन न करता अवैध पणे उपचार करत आहेत हे डॉक्टर नियमांची पायमल्ली करत उपचार पद्धतीत भीती निर्माण करत आहेत ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे. या ग्रामीण भागात संधीचा फायदा घेत गाव खेड्यातील भोळ्या- भाबड्या अशिक्षित रुग्णांना गंभीर आजारावर तत्काळ आराम, वेदना कमी करण्याचे आमिष दाखवून बोगस डॉक्टर जादा प्रमाणात व उच्च पावरची औषधे, बेसुमार व अनियमितपणे उपचार करीत आहेत या बोगस डॉक्टरांच्या उपचाराने रुग्णांचे दुखणे कमी होत आहे परंतु कालांतराने या डॉक्टरांनी केलेल्या औषधोपचाराने रुग्णांना किडींनी सारखा आजार जडून मृत्यू आपल्या कवेत घेत असल्यासारखे आहे.

या अवैध बोगस डॉक्टरांची गेल्या काही वर्षांपासून चांगलीच दुकानदारी सुरू आहे या बोगस डॉक्टरांवर कार्यवाही होत नसल्याने त्यांचे चांगलेच जमत आहे ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी सुरू केली आहे परिसरातील बोगस डॉक्टर तर फक्त औषधी लिहून देण्यापर्यंतच आपली प्रॅक्टिस सुरू न ठेवता त्यांनी आपल्या रुग्णांना भरती करून त्यांना सलाईन सुद्धा लावणे सुरू केले आहे त्यामुळे या झोला छाप डॉक्टर वर कारवाई होणार का अशी चर्चा होत आहे.

           जिवती तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये वैद्यकीय सुविधांची कमतरता असल्याचा फायदा घेत काही अनधिकृत व्यक्ती ‘डॉक्टर’ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ते एम. आर वैद्यकीय प्रतिनिधींकडून मिळणारे सॅम्पल्स आणि जास्त डोसचे पेनकिलर यांचा अतिरेकी वापर करतात. दीर्घकाळ या गोळ्या घेतल्याने किडनीवर विपरीत परिणाम होत असून अनेक रूग्णांचा डायलेसिस करावे लागत असल्याचे बोलले जात आहे.सर्दी,डोकेदुखी किंवा सांधेदुखीवरही इंजेक्शन आणि पेनकिलर गोळ्यांचा भडिमार करित आर्थिक लुटही केली जात आहे. आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे.

जिवती तालुक्यातील सर्व संशयित बोगस डॉक्टरांची यादी तयार करण्याचे काम तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केल्याची माहिती मिळाली असून.त्यांची पडताळणी करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी सांगितली असून नागरिकांनी सुध्दा प्रमाणीत डॉक्टरांकडेच उपचार घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये