ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आर्य वैश्य महिला महासभा भद्रावतीतर्फे गाईचे खाद्य वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          श्री वासवी कन्यका मातेच्या जन्मोत्सव दिनानिमित्त आर्य वैश्य महिला महासभा भद्रावती तर्फे नीमाताई विजय गोवरदिपे यांच्या गोठ्यात तील गाईंना खादय देण्यात आले गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचा निवास असतो .गोमातेच्या दुधाचे अनेक फायदे असतात. एक छोटेसे पुण्य कर्म म्हणून हे कार्य करण्यात आले.यावेळी आर्य वैश्य महिला महासभा भद्रावती तर्फे गोमातेला चाऱ्यासाठी देणगी स्वरूपात मदत देण्यातआली. या प्रसंगी गोमातेविषयी नीता गुंडावार यांनी तिच्या शेणाचे, शेणाच्या गोवऱ्या, गोमूत्र ,गोमातेच्या दुधाचे महत्त्व सांगितले. गोमाते वरून हात फिरवल्यानंतर काय फायदे होतात ते सुद्धा सांगितले. या कार्यक्रमासाठी आर्य वैश्य महिला महासभा भद्रावती च्या

अध्यक्षा सौ. धनश्री गुंडावार कोषाध्यक्ष सौ. ज्योती गुंडावार. सचिव सौ.भाग्यश्री दैदावार सह कोषाध्यक्ष सौ.मानसी बोटुवार सहसचिव सौ. अस्मिता झुलकंठीवार,नीता गुंडावार, सौ.मंगला गुंडावार सौ. प्रणाली पामपट्टीवार, सौ. अश्विनी पामपट्टीवार सौ. नीता गुंडावार सौ. स्वाती उपलेंचवार यांच्या सह सर्व सदस्य उपस्थीत होते. यांच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल सर्वत्र आर्य वैश्य महिला महासभेचे कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये