ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खरीप हंगामासाठी संधी! लाभ घ्यायचा असेल तर करा नोंदणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : खरीप हंगाम २०२६-२०२७ अंतर्गत विविध कृषी योजनांचा लाभघेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोरपना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्रमाणित बियाणे वितरण, तसेच पीक प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. या योजनांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा, असे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व पोषण अभियानांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, भरडधान्य आणि तेलबिया पिकांच्या उत्पादनवाढीसाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हानिहाय लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. कोरपना तालुक्यातील जास्तीत

जास्त शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन या योजनांसाठी अर्ज करावा व शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी केले आहे. कोरपना तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन या योजनांसाठी अर्ज करावा व शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये