ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धर्मानुरागी सुर्यकांत साहुजी यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

छत्रपती संभाजी नगर येथिल दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ श्रावक धर्मानुरागी , परम मुनी भक्त तसेच शहरांतील प्रसिद्ध फार्मासिटीकल नरेन्द्र साहुजी यांचे वडील श्री सुर्यकांतसा पुंजासा साहुजी यांचे दिनांक 6 मे रोजी सकाळीं 6 वाजता वृद्धपकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांचा परिवारातील सर्व सदस्यांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. व डॉ. किशोर सोनी, व्यंकटेश परिवार, भारत यांचे सोबत संपर्क साधून त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करुन घेतले. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे 2 अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळणार आहे.

त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सर्वच स्तरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. शहरांतील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध बिल्डर धरणेंद्र साहुजी यांचे ते वडिल होते. तर देऊळगाव राजा येथिल पत्रकार सन्मती जैन यांचे ते दाजी (जिजाजी) होतें.त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात 1 भाऊ,2 बहिनी,3 मुले,1 मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये