ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती तस्करांसाठी महसूलची कार्यवाही ठरत आहे नाममात्र

कार्यवाहीनंतर अवघ्या काही तासातच तस्कर करत आहे.. रेती उपसा आणि वाहतूक 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे रेती तस्करांचे हॉटस्पॉट म्हणजेच तालुक्यातील खडकपूर्णा धरण तसेच नदीपात्र, अवैध रेती तस्कर तसेच वाहतुकीवर निर्बंध घालणारे त्रिसूत्री उपाय योजना या ठिकाणी पूर्णतः अपयशी ठरत असल्याचे आज केलेल्या पाहणीत आढळून आले. देऊळगाव राजा: तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्र तसेच धरण आणि परिसर ज्या ठिकाणी रेती तस्करांनी आपले बसस्थान कायमस्वरूपी मांडले असून महसूलच्या दंडात्मक, आणि काही ठिकाणच्या पोलीस कारवाईला सदर तस्कर काही जुमानत नसल्याचे भयावह वास्तव आज केलेल्या पाहणीत आढळून आले. महसूल विभागाने केलेली दंडात्मक कार्यवाही ही त्यांच्यासाठी अतिशय किरकोळ ठरत असल्याने तुम्ही दररोज कारवाई करा आणि आमचा कार्यभाग सोडणार नाही हे यातून आज स्पष्ट जाणवले, कारण रेती तस्करांना महसूल विभागातील ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पूर्णपणे साथ असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

त्यामुळे कुठे आणि केव्हा अधिकाऱ्यांचे पथक कार्यवाही करणार याची परिपूर्ण माहिती रेती तस्करापर्यंत सदरील ग्राम पातळीवरील कर्मचारी पोहोचवीत असल्याने अधिकारी वर्ग सदर कर्मचाऱ्यावर कार्यवाही न करता चुप्पी साधत असल्याने याला अधिकाऱ्यांचे तर समर्थन नाही ना अशी चर्चा आता सर्वसामान्य जनतेत रंगू लागलीआहे. *अशा प्रकारे केल्या जाते धरणातून रेतीचा उपसा* आज प्रत्यक्ष धरण परिसरातील मेव्हणा राजा परिसरात धरणातून रेती उपसा कशा प्रकारे केला जातो याची प्रत्यक्ष पाहणी केली असता धरणामध्ये आठ ते दहा ब्रास रेती साठवण होईल अशा प्रकारची मोठी बोट, आणि दुसऱ्या बोटीमध्ये डिझेलवर रेती उपसा करणारे इंजिन बसवण्यात आलेले असून सदर इंजिन धरणामधील पाण्यातून रेतीचा उपसा करून एकीकडे पाणी आणि एकीकडे रेती ची साठवणूक करून उपलब्ध झालेले रेती किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात येते. आणि तेथून टिप्पर द्वारे निश्चित केलेल्या ठिकाणापर्यंत सदरची रेती पोहोचवण्यात येते.

*रात्रीतून लाखो रुपये किमतीच्या रेतीची होते चोरी* सदरचा उपसा हा प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात करता येतो एका बोटीतून लाखो रुपये किमतीची रात्रीतून किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात येते अशा प्रकारच्या असंख्य बोटी धरण तसेच परिसरात असल्याने ग्राम पातळीवर काम करणारे कर्मचारी यांच्या पाठबळामुळे अरे ती तस्कर आपला कार्यभाग सिद्धीस नेत असल्याने यांच्यावर ठोस कार्यवाही केव्हा होणार याचे उत्तर मात्र अधिकारी वर्गाकडे नसल्याचे जाणवले, *हे करता येतील उपाय* खडकपूर्णा धरण ज्यावेळेस पूर्णत्वास गेले त्यावेळेस नदीपात्रात शेजारील तसेच धरणात शेजारील जमिनी शेतकऱ्यांच्या अधिग्रहण करण्यात आल्या त्याच ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या जमिनी असल्यामुळे रेती तस्करांकडून वार्षिक वर्गणी घेऊन भाडेतत्त्वावर सदरच्या जमिनी त्यांच्यासाठी रेती साठवणे आणि त्या ठिकाणाहून वाहतूक करणे यासाठी देण्यात येते, सदर जमिनीचा गट क्रमांक आणि जमीन मालकाचे नाव माहित असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जर कठोर कार्यवाही करीत त्यांच्या सातबारावर दंडात्मक रकमेचा बोजा चढवून सक्तीची वसुली केली तर रेती तस्करांचा कायमस्वरूपी बिमोड होईल, परंतु हे न करता अधिकारी कर्मचारी नाममात्र कार्यवाही करण्याच्या नेहमीच बेतात असतात त्यामुळे रेती तस्करांना अभय कोणाचे हे सामान्य जनतेला आता तरी ज्ञात झाले आहे. *नऊ व्यक्तींच्या सातबारावर दीड कोटीचा बोजा* वर्षभरात महसूल विभागाकडून दंडात्मक कार्यवाही पोटी एकूण नऊ अवैध रेती लाभार्थ्यांच्या सातबारावर महसूल विभागाने एकूण एक कोटी 56 लाख 14 हजार 850 रुपयाचा बोजा चढवण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली यापैकी सदर अवैधरीती लाभार्थ्यांनी एक रुपया सुद्धा भरला नसल्याने महसूल विभाग त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याची कार्यवाही का करत नाही. याचे उत्तर सुद्धा अधिकारी वर्गाकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

*कार्यवाही फक्त महसूल विभाग बाकी का नाही* अवैध रेती तस्करांचा कायम बीमोड व्हावा यासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार महसूल विभाग, जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, आणि परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी असे सक्तीचे आदेश असताना महसूल विभाग आणि पोलीस वगळता अन्य विभागाने कसल्याही प्रकारच्या कार्यवाही केल्या नसल्याने नेमके पाणी कुठे मुरते आणि शासनाला संबंधित विभाग अवैधरती संदर्भात मासिक अहवाल कशाप्रकारे सादर करतात हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याने शासनाच्या सदर परिपत्रकाला संबंधित विभाग या ठिकाणी हरताळ फासत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अवैध रेती उपसा आणि वाहतूक यावर निर्बंध घालण्यासाठी महसूल पथक सदैव तत्पर राहून कार्यवाही करत आहे.

रेती उपसा करणाऱ्या अवैध बोटी ह्या सुद्धा कारवाईदरम्यान वेळोवेळी नष्ट केलेल्या आहेत, कार्यवाही करण्यासाठी महसूल पथक पूर्णतः सक्रिय असून कोणत्याही अवैध रेती तस्कराची गय केली जाणार नाही.-असे नायब तहसीलदार सायली जाधव यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये