ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरी येथे समाधान शिबिराचे आयोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या गोंडपिपरी शहरातील पंचायत समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे आयोजन शुक्रवार (दि. ८) रोजी करण्यात आले असून, या शिबिरातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ तसेच विविध प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर होणाऱ्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असून, या शिबिरातून सात बारा उताराचे त्वरित वितरण, जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरण, आधार कार्ड अद्ययावत, रेशन कार्ड दुरुस्ती आणि नवीन रेशन कार्ड वाटप, उत्पन्न व रहिवासी दाखले, अँग्रीस्टॅक नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश, स्वामित्व कार्ड अशा विविध प्रकारच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

   शिबिरात तहसील प्रशासन, पंचायत समिती, महावितरण, महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन विभाग यांसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असून, तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, प्रभारी तहसीलदार शेलवटकर, नायब तहसीलदार चंद्रशेखर वेटे, मंडळ अधिकारी सुकेसिनी कांबळे, गोंडपिपरी तलाठी दीपक झाडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये