ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाबा पोलिसांची धडक कारवाई, ५ दिवसांत २३ लाखांच्या केबल चोरीचा उलगडा

८८ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त ; पाच आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ धाबा पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत २३ लाख ८८ हजार रुपयांच्या ईलेक्ट्रिक हायटेन्शन पॉवर केबल चोरी प्रकरणाचा छडा लावत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली केबल, वाहने व मोबाईलसह एकूण ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत समीर रमेश डिवरे (वय ४७, रा. समर्थ नगरी, सोनेगाव, नागपूर) यांनी धाबा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ते DUSKLINE INFRASTRUCTURES PRIVATE LIMITED, नागपूर या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. संबंधित कंपनीकडून एमएसईडीसीएलसाठी गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली-वटराणा जंगल परिसरात अंडरग्राउंड वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी मौजा गोजोली येथील सुकवासी फाटा परिसरात 19/33 केव्ही एचटी पॉवर केबलचे दोन ड्रम ठेवण्यात आले होते.

दि. ११ एप्रिल २०२६ ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ३००x३०० चौ. मिमी. आकाराचे दोन केबल ड्रम चोरी करून नेले. याप्रकरणी धाबा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ४०/२६ दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाबा पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध घेतला.

या प्रकरणी राकेश जागेश्वर भोयर (रा. नागपूर), ज्योतिष प्रभू प्रसाद (रा. नागपूर), अभिनय कुमार रामलक्षन प्रसाद (मूळ रा. उत्तर प्रदेश), हरिप्रसाद श्यामजी उईके (मूळ रा. मध्यप्रदेश) आणि दीपक चेकर उईके (मूळ रा. मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून चोरीस गेलेले एचटी पॉवर केबलचे दोन ड्रम, एक हायड्रा क्रेन, दोन आयशर वाहने, एक होंडा सिटी कार तसेच विविध मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई प्रभारी अधिकारी सपोनि सुबोध वंजारी, पोभ. श्रावण कुत्तरमारे, पोअं. प्यारेलाल देव्हारे, पोअं. गजानन तुरेकर आणि नापो. रामेश्वर पाल यांनी केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून ८ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये