ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साईनाथ कोडापे यांना ‘भगवान बिरसा मुंडा पुरस्कार २०२६’ प्रदान

आ. जोरगेवार यांच्या हस्ते चंद्रपुरात गौरव ; लाठी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील लाठी येथील माजी उपसरपंच साईनाथ कोडापे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘भगवान बिरसा मुंडा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘आदिवासी गौरव दिना’चे औचित्य साधून आदिवासी समाजातील गौरवशाली व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आणि हक्कांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये साईनाथ कोडापे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

साईनाथ कोडापे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागात राहून सामाजिक कार्याची आवड जोपासत समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीचा राज्यस्तरावर गौरव होणे ही लाठी गावासह गोंडपिपरी तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

चंद्रपूर येथील भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय, गांधी चौक येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना साईनाथ कोडापे यांचा गौरव करण्यात आला.

या पुरस्कारामुळे लाठी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना अशा पुरस्कारांमुळे निश्चितच नवी प्रेरणा मिळणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये