ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केमारा येथे वैयक्तिक वनहक्क दावे स्वीकृती कॅम्प

तहसिल कार्यालय आपल्या दारी ; केमारा,भटारी,देवई येथील ४२ दाव्यांचे अर्ज स्विकृत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :- तालुक्यातील केमारा येथे तहसील कार्यालय मार्फत वैयक्तिक वनहक्क दावे स्वीकृती कॅम्पचे आयोजन दि.१२ डिसेंबरला करण्यात आले.वैयक्तिक वनहक्क दावे सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ रीतीने पार पाडता यावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.कॅम्पमध्ये ४२ वैयक्तिक वनहक्क दावे स्विकृत करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, तहसीलदार मोहनिश शेलवटकर,नायाब तहसीलदार रामकृष्ण उईके, दिपाली आत्राम,विकास जिडगिलवार,मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके,सुनील चौधरी,तलाठी प्रणाली तुंड्डुलवार,मेरी गजभिये, स्वप्नील पारलेवार, विरेंद्र वाळके यांची उपस्थिती होती.

कॅम्पमध्ये केमारा,भटारी,देवई या गावातील सादर करण्यात आलेले वैयक्तिक वनहक्क दाव्यांचे अर्ज भरणे,अभिलेखांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करणे, इतर आवश्यक सेवा, तसेच दावे संदर्भात आवश्यक जाणकारी व मार्गदर्शन लाभार्थ्यांना देण्यात आले.सदर कॅम्पदरम्यान लाभार्थ्यांना वैयक्तिक वनहक्क दावे सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ रीतीने पार पाडता यावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.यावेळी उपस्थितांना उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी यांनी मार्गदर्शन केले.

कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर करण्यात आले. कॅम्पाचे नियोजन व अंमलबजावणी संबंधित सर्व विभागांच्या समन्वयातून पार पाडण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये