ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पाणी कराचा त्वरित भरणा करावा अन्यथा कार्यवाहीला सामोरे जा
नगर परिषद भद्रावतीची धडक मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगर परिषद भद्रावतीच्या हद्दीतील ज्या पाणी कर धारकांकडे दीर्घकाळापासून पाणी कर थकीत आहे अशा धारकांविरुद्ध नगर परिषदेमार्फत वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. वसुली करीता विशेष मोहिम राबविण्यातत येत असुन पुर्व सुचना देउनही ज्यां नळ धारकांनी थकित पाणी कर भरलेला नाही. अश्या नळ धारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याlत येत आहे. तरी नळ धारकांनी तात्काळ आपला थकित पाणी कर भरुन कार्यवाही टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे.
उचित आवाहनास प्रतिसाद न दिल्यास विशेष मोहिमेच्या अनुषंगाने कार्यवाही करून थकबाकीदारांचे घरगुती नळ कनेक्शन खंडित केल्या जाईल याची सर्व थकबाकीदार नळ धारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी केले आहे.



