ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तहसीलमध्ये भाजपची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

घोडपेठ–पाटाला मंडळातील शेकडो शक्ती प्रमुख व बूथ प्रमुखांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       भद्रावती तहसीलमधील घोडपेठ–पाटाला मंडळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शक्ती प्रमुख व बूथ प्रमुखांसाठी १४ व १५ मार्च रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा शिंदे मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, चंद्रपूर जिल्ह्याचे संघ प्रमुख तुषार देवपुजारी, वरोरा–भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे, सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, आमदार प्रतिनिधी किशोर बावने, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तालुका अध्यक्ष श्यामसुंदर उरकुडे, महामंत्री विजय वानखेडे व राकेश तलावार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यशाळेत केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच बूथ व्यवस्थापन, संघटन बळकटीकरण आणि योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वक्त्यांनी सोशल मीडियाचा वापर, घराघरांत संपर्क व सामुदायिक बैठका यांच्या माध्यमातून योजनांचा प्रभावी प्रचार करण्यावर भर दिला.

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने जनसंपर्क ठेवण्याचे आवाहन केले. आमदार करण देवतळे यांनी स्थानिक प्रश्नांशी जोडून शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

संघ प्रमुख तुषार देवपुजारी यांनी कार्यकर्त्यांना संघटित व अनुशासित राहण्याचे आवाहन केले, तर सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी विविध आर्थिक योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत घोडपेठ–पाटाला मंडळातील शेकडो शक्ती प्रमुख व बूथ प्रमुखांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यशाळेमुळे मंडळ स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ बळकटीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये