बल्लारपूर नगरीतील मुख्य मार्गावरील जड वाहतूक व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नियंत्रित करावी _ प्रशांत झांमरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर शहरात मध्ये मागील काही महिन्यात बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावरती मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्या अपघातामध्ये कुठलीही चूक नसताना अनेक निष्पाप जीव गेले तसेच शरीराने अपंग सुद्धा झाले आहेत.
शहरातील मुख्य मार्गावर होणाऱ्या अपघाताला सर्वस्वी जबाबदार फक्त बल्लारपूर शहरांत चालणारी अनियंत्रित जड वाहनेच नसून शासनाने व प्रशासनाने याकडे केलेले दुर्लक्ष हे सुद्धा या अपघातांना मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे.
बल्लारपूर शहरातून जाणारा मुख्य मार्ग हा दक्षिण राज्यांना जोडणारा असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. जड वाहन शहरातून जात असताना वेग मर्यादा निश्चित नसल्यामुळे व शाळांच्या वेळेवर नो एन्ट्री लावण्यात शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दर आठवड्यात शहरातील मुख्य रस्त्यावर निष्पाप लोक अपघाताला बळी पडत आहेत.
त्यासोबतच बामणी ते दहेली मुख्य मार्गावर विशेषता माउंट फोर्ट शाळेसमोरील मार्गावर सुरजागड प्रकल्पातील जड वाहने अनधिकृत पणे रस्त्याच्या दोन्हीकडेला अनधिकृतपणे उभे केली जातात ज्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात कोळंबा निर्माण होऊन अपघाताची परिस्थिती निर्माण होत आहे व याला सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासन आहे.
शाळेच्या वेळेवरती नो एन्ट्री लावावी व मुख्य रस्त्यावरील झालेले अतिक्रमण लवकरात लवकर हटविण्यात यावे तसेच सुरजागडचे मुजोर रीला सुद्धा आळा बसू देत यावा जेणेकरून निष्पाप लोकांचे जीव सुरक्षित होतील.
या पत्राद्वारे माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करण्यात आली की वरील दिलेल्या मुद्द्यावर आपण लवकरात लवकर संबंधित विभागाला अधिकाऱ्यांना सूचना करून हा प्रश्न मार्गी काढावा.
अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर नगरीमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाच्या परिणामाची सर्वसवी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील. अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ झांमरे यांनी आपल्या निवेदना द्वारे दिली.
निवेदन देत असताना सुरज चौबे, दर्शन मोरे, ओम रायपुरे, रतन फुलकर, मनोज बालमवार, समीर शेख, बबलू करमरकर, गणेश डोंगरे, आकाश ताकसांडे, तुषार महेशकर, आकाश उपुटला, स्वयम दुधे, निशा मेश्राम, सौरभ दुधे, राहुल जक्कू उपस्थित होते.



