ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संसद की पिकनिक स्पॉट? राहुल गांधींच्या ‘चाय-पार्टी’चा कोरपना भाजप कार्यकर्त्यांकडून समाचार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे देशाच्या विकासाची चर्चा करण्याचे ठिकाण. मात्र, काँग्रेसच्या खासदारांनी या पवित्र वास्तूच्या प्रवेशद्वारावर चहा-बिस्किटांचा आनंद घेत संसदेच्या प्रतिष्ठेला हरताळ फासला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोरपना येथे महामोर्चा काढण्यात आला.

तालुकाध्यक्षांनी  यावेळी बोलताना सांगितले की, “ज्या जनतेने या खासदारांना संसदेत प्रश्न मांडण्यासाठी पाठवले, ते तिथे जाऊन फोटो सेशन आणि नाश्ता करत आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. ही लोकशाहीची थट्टा असून अध्यक्षांच्या आदेशाचा अनादर आहे.”

यावेळी कार्यकर्त्यांनी फलक दाखवून काँग्रेसच्या ‘फोटोग्राफी’ राजकारणाचा निषेध केला. गॅस टंचाईच्या वावड्या उठवून सामान्य जनतेला घाबरवणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता समोर आला आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये