आत्माराम देशमुख यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ कृतज्ञता सोहळा संपन्न
आमदार करण देवतळे यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आत्माराम मोतीराम देशमुख नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी एका छोटेखानी पण सुंदर कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. या कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्षस्थानी आदरणीय डॉक्टर विवेक शिंदे साहेब अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती हे होते. उद्घाटक म्हणून आदरणीय करण देवतळे साहेब आमदार भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्र हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय डॉक्टर कार्तिक शिंदे साहेब सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, आदरणीय डॉक्टर प्रकाश महाकाळकर साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती, आ. प्राचार्य एल एस लडके सर नीलकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती प्रफुल चटकी नगराध्यक्ष न.प.भद्रावती, प्राचार्य सुधीर मोते सर यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती सर्व अतिथी मंचावर उपस्थित होते.
या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता असे सत्कारमूर्ती रिद्धेश्वर पाटील वारजूरकर तथा शामराव आनंदराव निनावे लाखांदूर हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. या कृतज्ञता सोहळ्याच्या अनुषंगाने रिद्धेश्वर पाटील वारजूरकर, श्यामराव निनावे, भुजंगरावजी गलांडे वाघोली, जि.वर्धा यांचा पाहुण्यांच्या हस्ते यथोचित शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन डॉक्टर विवेक शिंदे तथा डॉक्टर कार्तिक शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच सोहळ्याच्या माध्यमातून उद्घाटक वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे साहेब यांच्या हस्ते आत्माराम देशमुख तथा वैशाली देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भद्रातील शिक्षण संस्था भद्रावतीच्या माध्यमातून संस्थाध्यक्ष तथा संस्था सचिव यांच्या हस्ते आत्माराम देशमुख सर यांचं यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला या कृतज्ञता सोहळ्याचे प्रसंगी मान्यवर अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे सर, सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर प्राचार्य डॉक्टर एल एस लडके नगराध्यक्ष प्रफुल चुटकी प्राचार्य डॉक्टर सुधीर मोते तथा सर्व मान्यवरांनी कृतज्ञता सोहळ्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना मान्यवरांनी सेवानिवृत्त आत्माराम देशमुख यांच्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा लेखाजोखा मांडला. या कृतज्ञता सोहळ्याला माझी विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातील मित्रपरिवार हे सुद्धा यावेळी आपल्या आदर्श शिक्षकाप्रती व्यक्त झाले.
या कार्यक्रमाच्या प्रास्तविकेच्या माध्यमातून खुशाल डबले सर ब्रह्मपुरी . यांनी आत्माराम देशमुखयांचा खडतर जीवन प्रवास कथन केला. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर ढोक यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे आभार सौ वैशालीताई देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाला आजी -माजी विद्यार्थी, मित्रपरिवार, आप्तेष्ट आणि संपूर्ण परिवार , नातेवाईक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सहभोजन करून झाली.



