शेत शिवारातील चन्याच्या ढिगाला आग लावुन शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
दोन आरोपीस निष्पन्न करून अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 01/03/2026 रोजी फिर्यादी नामे गजानन कांबळे राहणार वघाळा ता. सेलू यांच्या मुकिंदापूर शेत शिवारात पाच एकर शेतीमध्ये चना पेरला होता. दिनांक 28/02/2026 चे रात्र दरम्यान अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या शेतातील चण्याच्या ढिगाला आग लावून शेतकऱ्याचे 2,50,000/- रुपयाचे नुकसान केल्याबाबत पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा पोलीस स्टेशन सेलू येथील पोलीस अमलदार विक्रम काळमेघ व रामकिसन इप्पर यांच्याकडून गुन्हाचा तपास करीत असताना दिनांक 16/03/2026 रोज पोलीस स्टेशन सेलू नमूद अंमलदार यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे 1) राहुल रमेशराव श्रीखंडे वय 34 वर्ष रा. कोपरा ता. सेलू जि. वर्धा 2) मंगेश रामदासजी भुजाडे वय 34 वर्ष रा. कोपरा ता. सेलू जि. वर्धा याना ताब्यात घेऊन देवेंद्र ठाकूर ठाणेदार सेलू यांच्या मार्गदर्शनात दोन्ही आरोपींताची कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींतानी मुकिंदापूर शेत शिवारातील फिर्यादी यांच्या शेतातील चन्याचा ढिगाला आग लावून 2,50,000/- रुपये नुकसान केले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर ठाणेदार पोलीस स्टेशन सेलू, पोउनि प्रितम निमगडे पोलीस आमलदार विक्रम काळमेघ, रामकिसन इप्पर* यांनी केली आहे.



