ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर महानगर जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय मंडळ प्रशिक्षण महाअभियानाची सुरुवात

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय मंडळ प्रशिक्षण महाअभियानाची सुरुवात चंद्रपूर महानगर जिल्ह्यातील तुकूम (उत्तर) मंडळ येथे उत्साहात करण्यात आली. दोन दिवसीय हे प्रशिक्षण अभियान दि. १४ व १५ मार्च २०२६ रोजी पार पडले.

राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण महाअभियानाचे मार्गदर्शन माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार तसेच भाजपा महानगरचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रशिक्षण जिल्हा प्रमुख श्री सुभाष कासनगोट्टुवार यांनी केले.

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारधारा, संघटनात्मक कामकाज, नेतृत्व क्षमता आणि कार्यकुशलतेबाबत प्रशिक्षण देणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ या तत्त्वांवर आधारित हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश कार्यकर्त्यांची संघटनात्मक क्षमता वाढविणे, पक्षाच्या कार्यपद्धती व धोरणांची माहिती देणे, कार्यकर्त्यांना सक्षम बनविणे तसेच बूथ व्यवस्थापन, निवडणूक तयारी, सामाजिक माध्यमांचा वापर आणि जनसंपर्क कौशल्ये विकसित करणे हा आहे. तसेच आगामी कार्यक्रम, निवडणुका आणि जनसंपर्क उपक्रमांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याचा हेतू या अभियानामागे आहे.

या मंडळ कार्यशाळेला जिल्हा संयोजक श्री सुभाष कासनगोट्टुवार, महामंत्री श्री रवींद्र गुरनुले, राज्य परिषद सदस्य श्री तुषार भैय्या सोम, जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद शास्त्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे वक्ते म्हणून श्री दिवाकर पुद्धटवार, श्री संजीव खोब्रागडे, श्री राकेश नाकाडे, श्री प्रवीण गिलबिले, श्री सुमित बेले, सौ. प्रज्ञा गंधेवार, श्री स्वप्निल डुकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी नगरसेविका सौ. शितल गुरनुले, सौ. पुष्पा उराडे, सौ. अनुजा तायडे, मंडळ महामंत्री श्री श्रीकांत भोयर, श्री निलेश बेलखेडे, ओ.बी.सी. नेते श्री. मधुकर राउत तसेच सर्व शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात योग प्रशिक्षक म्हणून सौ. मंजुश्री कासनगोट्टुवार यांनी योग प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली. समारोपिय भाषण श्री प्रलय म्हशाखेत्री यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अध्यक्ष श्री स्वप्निल डुकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अमोल लोणारवार यांनी मानले.

कार्यशाळेत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये