उपक्रमशील शिक्षक नागनाथ बोरुळे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना द्वारा आयोजित शिक्षक/अधिकारी कर्मचारी विभागस्तरीय स्पर्धा नुकत्याच महिला अध्यापक विद्यालय सहकार नगर भंडारा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
त्यात शाळांमधील विविध क्लब सादरीकरण स्पर्धेत जिवती तालुक्याचे प्रतिनिधित्व करित नागनाथ माधव बोरुळे स.शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबेझरी येथील उपक्रमशिल शिक्षक यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक अमर साठे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जिवती, देवानंद रामगिरकर शिक्षण विस्तार अधिकारी,संदिप चौधरी शिक्षण विस्तार अधिकारी,साधना धांडे केंद्रप्रमुख पाटण, शाळेचे मुख्याध्यापक बंडू राठोड,सुभाष उमरे,पायल शिंदे, जागृती उपरे व पाटण केंद्रातील सर्व शिक्षकवृंदांना दिले.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



