जुनगाव रेती घाटावर उपविभागीय अधिकाऱ्याची कारवाई
रात्री रेती उपसा करणारा पोकलॅण्ड ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- तालुक्यातील जुनगाव रेती घाटावर गुरूवारच्या रात्री सुरू असलेला अवैध रेती उत्खनन उपविभागीय अधिकाऱ्यांने धाड टाकून हाणून पाडला. या कारवाईत रेती उपसा करत असलेला पोकलॅण्ड ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास महसूल विभागामार्फत सुरू आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव परिसरातील वैनगंगा नदीवरून काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास अवैध रेती उपसा होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी यांनी पथकासह दि.११ डिसेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अचानक जुनगाव रेती घाटावर धडक कारवाई केली.या घाटातून अवैध रेती उत्खनन करणारा वीना नंबरचा पोकलॅण्ड मशीन आढूळून आला.उपविभागिय अधिकाऱ्यांचे पथक पाहताच पोकलॅण्ड मशीन चालक व इतर लोकं पळून गेले.ताब्यात घेतलेला पोकलॅण्ड मशीन महसूल विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आला असून संबंधित ठेकेदार व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी तहसीलदार मोहनिश शेलवटकर,मंडळ अधिकारी सुनील चौधरी,दिनकर शेडमाके,तलाठी विरेंद्र वाळके,आसिफ पठाण, क्षितीज दुपारे,निलेश मत्ते उपस्थित होते.
मागील पंधरा दिवसात पोंभूर्णा तालुक्यात अवैध रेती उत्खननाचे एकूण चार कारवाया झाल्या आहेत.झालेल्या या कारवाया मधून ३६ लाख रुपयांचा महसूल शासनास जमा झाला.



