घुग्गुस कमल स्पोर्टिंग क्लब तर्फे रघुवीर अहीर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
कमल स्पोर्टींग क्लब घुग्गुस तर्फे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तथा कमल स्पोर्टींग क्लबचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रघुवीर अहिर यांचा वाढदिवस स्थानिक गांधी चौक, घुग्गुस येथे आयोजित करण्यात आला होता. कमल स्पोर्टींग क्लब व भाजपा घुग्गुस पदाधिकारी व कार्यकर्त्यानी केक कापून रघुवीर अहिर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी गांधी चौक येथे जनतेला केक वाटप करण्यात आली. याप्रसंगी भाजप घुग्गुसचे शहर अध्यक्ष संजय तिवारी, भाजपा नेत्या पुजाताई दुर्गम, भाजपा घुग्गुस महिला अध्यक्ष सुचिताताई लुट्टे, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, विनोद चौधरी, माजी जिल्हापरिषद सदस्य नितुताई चौधरी, आशिष मासिरकर, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रघुवीर अहिर यांनी यावेळी बोलताना वाढदिवसा निमित्त दिलेले प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छांचा सदैव ऋणी राहील असे म्हणत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. तसेच आयोजक कमल स्पोर्टींग क्लबचे घुग्गुसचे अध्यक्ष पवन पुरेली यांचेसह राजकुमारजी गोडशेलवार, सुरजजी मोरपाका, हेमंतजी उरकुडे, गणेशजी पिंपळकर, श्रीकांत नुने, नीरज यादव, विशाल दामेर, वामशी महाकाले, गुड्डू शेख, गौरव ठाकरे, हेमराज बोबडे, अक्षय कुंतलवार, रक्षित सुदरगिरी, ऋतुजा नागापुरे, ऍड. प्रतीक्षा देऊळकर, प्रेमा तगरपवार व संपूर्ण घुग्गुस कमल स्पोर्टींग क्लबच्या चमूचे विशेष आभार मानले.


