ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात स्व.वामनराव गड्डमवार यांची जयंती साजरी

जयंतीप्रित्यर्थ विविध बौद्धिक स्पर्धांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री,लोकनेते स्वर्गीय वामनराव पाटील गड्डमवार यांची ८८ वी जयंती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे विविध उपक्रम आणि बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात सर्व प्रथम स्व.वामनराव पाटील गड्डमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

स्व.वामनराव पाटील गड्डमवार यांनी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात भरीव कार्य करून सबंध महाराष्ट्रात अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून आपली ओळख निर्माण केली असे अध्यक्षीय भाषणातून भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार यांनी विचार व्यक्त केले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष संदीप भाऊ गड्डमवार,सदस्य अजयभाऊ गड्डमवार,प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली,रवल गड्डमवार,नगरसेवक गुणवंत सुरमवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,कॉन्व्हेन्टचे प्राचार्य पांडुरंग अमृतवार उपस्थित होते.

विद्यालयाचे शिक्षक राजू केदार यांनी स्व.वामनराव पाटील गड्डमवार यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

लोकनेते वामनराव पाटील गड्डमवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आणि सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात विजेत्या स्पर्धकांचे पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी गड्डमवार साहेबांचे विद्यालय आणि विद्यार्थ्याप्रति असलेले प्रेम,माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गावाचा आणि तालुक्याचा नाव देशात कसे मोठे करेल असे सांगून गड्डमवार साहेबांचे असलेले स्वप्न पूर्ण करावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जयंतीदिनी कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक भुजंगराव आभारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये