सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने शिक्षक दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा,सहकार महर्षी स्व.भास्कररावजी शिंवगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा व जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी विरंगुळा भवन येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा अशोक डोईफोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खांडेभराड,. गोविंदराव बोरकर,अरुण सपाटे, रमेश नरोडे ,प्रकाश अहिरे, प्रा.विजयकुमार रायमल ,मधुकरराव शेळके , मधुकरराव धुळे , रमेश गवई , पंडितराव पाथरकर कृष्ण खडके, कुटे सर उपस्थित होते. यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण, महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ,उपस्थित मान्यवरांनी शिक्षक दिन चे तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन रमेश नरोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदराव बोरकर यांनी केले.