शिक्षक दिनी आदर्श शिक्षकाचा सत्कार !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय धोटे,सुदर्शन निमकर,विजय बावणे,सुरेश केंद्रे,शिवाजी सेलोकर,संदिप शेरकी,संभाजी वारकड प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा,अविनाश जाधव,नंदकिशोर वाढई उपस्थित होते.मागील वर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने शिक्षक दिनानिमित्त नागनाथ माधव बोरुळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच सन २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरिय प्रथम क्रमांक मिळाल्याने शाळेचे मुख्याध्यापक बंडू राठोड,नागनाथ बोरुळे,मिलिंद मुसळे,पायल शिंदे,जागृती उपरे,दामोधर घुले यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.